कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Raut Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणत महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी यावर बोलावं असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय. त्यामुळे मोदींनी कोरोनाचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी मोदींच्या आरोपावर उत्तर द्यावे, प्रत्येक वेळी मीच बोलायचा ठेका घेतला नाही असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सुप्रीम कोर्टानं, हाय कोर्टानं इतरांना दिले आहेत.. त्यामुळे मोदींनी अशा प्रकारचा आरोप करणे म्हणजे डॉक्टर, नर्सेस यांनी काम केलं, हौतात्म्य पत्करलं त्यांचा अपमान आहे असेही राऊतांनी म्हंटल.