हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजापूर दौऱ्यावर असताना तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असे साकडे घातले. त्यांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आणि तेच हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील. सोनिया गांधी, शरद पवार आणि खुद्द सुप्रियाजीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर खूश आहेत, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारांवरून एक दावाही केला. ते म्हणाले की, भाजपने जे काही उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांच्याबद्दल जरा बारकाईने विचार केल्यास असे समजेल कि ते उमेदवार हे भाजपच्या मुशीत घडलेले नाहीत, तर ते बाहेरचे आहेत. आणि अशांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
मला आश्चर्य वाटतंय दोन्ही उमेदवार आहेत राज्यसभेचे ते भाजपचे नाहीत, तर ते बाहेरचे आहेत. भाजपचे निष्ठावान आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. जे इतर पक्षातून आलेले आहेत, जे शरद पवार, महाविकास आघाडीवर चिखलफेक करतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे, हे स्पष्ट दिसते.
भाजपनेच संभाजीराजेंना वाऱ्यावर सोडले
यावेर्ळी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपने अगोदर संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा, सहाव्या जागेसाठी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाऱ्यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. पण हा त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत यांनी म्हंटले.