हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात असताना मंगळवारी संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन अल्पमतात आलेल्या राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र सादर केले. त्यापाठोपाठ आज सकाळी राज्यपालांनीही राज्य सरकारला ३० जुलै अर्थात गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन पाचारण केले आहे. यावरून आम्ही विश्वासदर्शक ठरावा विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
गेल्या अडीच वर्षांपासून जी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी प्रलंबित आहे. त्यावर काही निर्णय नाही. पण राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते. आमच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल. आता आम्ही एक भूमिका घेतली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
यावेळी राऊतांनी फडणवीसांनाही टोला लगावला. “राफेलचा वेगही या ठिकाणी कमी पडेल इतक्या वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपाकडून हे सर्व केले जात असल्याचा अर्थ त्या बंडखोरांना तोडण्यात भाजपाचाही हात असणारच. असे राजकारण जर तुम्ही करत असाल तर तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ, असे राऊत यमाई म्हंटले आहे.