हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होऊ शकते अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, या सर्व अफवा आहेत अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सुद्धा सांगितला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, जिंकेल त्याची जागा हेच आमच्या जागावाटपाचे सूत्र आहे. देशभरातील इंडिया आघाडी हाच फॉर्म्युला कायम ठेवणार आहे. लोकसभा निवडणुकीत 48 जागांवर मेरिटच्या आधारावर जागावाटप होईल. जो पक्ष ज्या मतदारसंघात बलवान आहे तो ती जागा लढेल. शिवसेम आधीपासून 23 जागा लढत आली आहे. आता त्यातील एखाद्या जागेवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दावा करत असेल तर त्याबाबत चर्चा करण्यात येईल असेही राऊतांनी स्पष्ट केलं. काल जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी जागावाटपावर चर्चा केली आहे अशीच माहिती राऊतांनी दिली.
वंचित ला महाविकास आघाडीत घेणार का?
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) महाविकास आघाडीत घेणार का याबाबत प्रश्न केला असता संजय राऊत म्हणाले, वंचितला आपल्यासोबत घ्यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. स्वतः उद्धव ठाकरे यासाठी आग्रही आहेत. शरद पवार यांचीही शी कुठलीही भूमिका नाही की वंचित आपल्या सोबत येऊ नये. महाराष्ट्र काँग्रेसची भूमिका सुद्धा वंचितला सोबत घेण्याचीच आहे.