हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावरकरांच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचे काम नेहरूंनी केले. त्यांनी ते काम केले नसते तर देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता, असे राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सावरकर व नेहरूंबद्दल सांगायचे झाले तर दोघांनी देशासाठी खूप योगदान दिले आहे. या दोघांचं कार्य मोठे आहे. पण या दोघांवर सध्या टीका केली जात आहे. मात्र, असे होता कामा नये. दोघांभोवतीचे राजकारण आता तरी थांबायला पाहिजे.
सावरकरांचा सन्मान होईल असे काम फडणवीस-मोदींकडून नाही
संजय राऊतांनी टीका केल्यानंतर सामनाच्या अग्रेलखातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणाब साधण्यात आला आहे. “गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल, असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही”, असे सामनात बोलण्यात आले आहे.