नवी दिल्ली । घर खरेदी करण्याची प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने एक विशेष ऑफर दिली आहे. सणासुदीच्या हंगामात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षक डील्स आणि ऑफर देत आहे. होम लोन दरामध्ये SBI 0.25 टक्के सवलत देण्याबरोबर प्रोसेसिंग फीस (Home Loan Processing Fees) घेत नाही. अशा परिस्थितीत घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल. सध्या SBI 6.79% दराने SBI होम लोनवर प्रारंभिक व्याज देत आहे, जो 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आहे.
SBI कडून या खास ऑफरबद्दल जाणून घेउयात
> SBI च्या 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तुम्हाला वार्षिक 6.90 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. SBI ने दिलेला हा सर्वात कमी होमलोन व्याज दर आहे.
> सणाच्या हंगामात SBI 0.25 टक्के व्याजदराची सूट देईल.
> या ऑफर अंतर्गत SBI कडून कर्ज घेताना तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फीस घेतली जाणार नाही. SBI 100 टक्के प्रोसेसिंग फीस माफ करेल.
> जर तुम्ही SBI मोबाईल अॅप म्हणजेच योनो अॅपच्या माध्यमातून होम लोन साठी अर्ज केला तर तुम्हाला त्यासाठी खास सवलत दिली जाईल.
SBI मध्ये 30 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनसाठी 6.90 टक्के व्याज दिले जाणार. त्याचबरोबर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त होम लोच्या रकमेवर हा व्याज दर 7 टक्के असेल. 75 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करण्यात ग्राहकांना 0.25% व्याज सवलत मिळेल. व्याजातील ही सवलत ग्राहकांच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असेल. तसेच, ही सवलत केवळ योनो अॅप वरून अर्ज केल्यावर उपलब्ध होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.