हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये फिक्स डिपॉझिट(FD)वरील व्याजदर खूप कमी झाला. या कमी झालेल्या व्याजदरामुळे आपण चिंतीत आहात काय? चिंतीत असाल तर एसबीआयचा हा नवीन प्लॅन आपल्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. ज्या लोकांना रिटायरमेंट सेविंग करायची आहे. अशा लोकांसाठी एसबीआयची नवीन स्कीम हि फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त लाभदायक ठरणार आहे.
एसबीआयची ‘रिटायरमेंट बेनिफिट फंड’ ही म्युच्युअल फंडाची नवीन स्कीम आहे. ही स्कीम 3 फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध असणार आहे. रिटायरमेंट बेनिफिट फंड लॉन्च ही एक न्यू फंड ऑफर असून, याचे पूर्ण नाव ‘एसबीआय रिटायरमेंट बेनिफिट फंड सोलुशन ओरिएंटेड स्कीम’ असे आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीत कमी 5000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. NFO म्हणजे न्यु फंड ऑफर. ही मॅनेजमेंट कंपनीची एक नवीन स्कीम असते. जी म्युचल- फंडमध्ये आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते.
जे गुंतवणूकदार ‘एसबीआय रिटायरमेंट बेनिफिट फंड सोलुशन ओरिएंटेड स्कीम’मध्ये गुंतवणूक करतील त्यांच्यासाठी, एसबीआय म्युचल फंड ग्राहकांना 50 लाखाचे विमा कव्हर देणार आहे. यामध्ये रिटायरमेंट बेनिफिट फंड मार्फत तीन वर्ष किंवा जास्तीच्या विमा सुरक्षेसाठी अर्ज करू शकतो. गुंतवणूकदाराला भविष्यात काही दुर्घटना झाल्यास त्याने ठरवलेल्या नॉमिनीला पन्नास लाखांची विमा रक्कम मिळेल.