हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक खास वेब पोर्टल सुरू केले आहे. एसबीआयने या वेबसाइटला ‘एसबीआय पेन्शन सर्व्हिस’ असे नाव दिले आहे. या सरकारी बँकेच्या विशेष सेवेनंतर निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर, त्यांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी पेन्शन पेमेंट बँक आहे. केंद्र सरकारच्या विविध एजन्सी आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना एसबीआय मार्फत पेन्शन दिले जाते. यात संरक्षण, रेल्वे, टपाल, दूरसंचार आणि नागरी क्षेत्रातील पेंशनधारक आहेत.
या व्यतिरिक्त एसबीआय विविध राज्य सरकार आणि इतर स्वायत्त संघटनांशी जोडलेली आहे. एसबीआयद्वारे मिळणाऱ्या पेन्शनधारकांची संख्या ही 54 लाख आहे. या वेब पोर्टलवर एसबीआयच्या माध्यमातून पेंशनधारकांना कोणत्या सुविधा उपलब्ध असतील ते जाणून घेवूयात.
पेंशनर्स कॅलकुलेशन शीट्स डाउनलोड करण्यास सक्षम असतील.
पेंशन स्लिप/फॉर्म 16 डाउनलोड करण्याची सुविधा
पेन्शन प्रोफाइल डिटेल्सची माहिती
गुंतवणूकीच्या डिटेल्सशी संबंधित माहिती
लाइफ सर्टिफिकेट स्टेटसची माहिती
ट्रांजेक्शंस डिटेल्स
या वेब पोर्टलवर पेंशनर्स साठी रजिस्ट्रेशन करण्याचा मार्ग कोणता आहे?
एसबीआयकडे निवृत्तीवेतन खाते असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना या एसबीआय पेन्शन सर्व्हिसेस वेबसाइटचा लाभ घेण्यासाठी प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी, https://www.pensionseva.sbi/ ता लिंकवर जा.
यासाठी, सर्वात प्रथम, टॉपवर रजिस्ट्रेशनच्या टॅबवर क्लिक करा आणि नंतर कमीतकमी 5 कॅरॅक्टर असलेला युझर आयडी तयार करा. आपला पेन्शन खाते क्रमांक आणि जन्मतारीख पुढच्या स्टेपमध्ये भरावा लागेल. त्यानंतर पेन्शन भरणाऱ्या बँक शाखेचा शाखा कोड भरा. यानंतर, बँकेच्या शाखेत रजिस्टर असलेला आपला ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि नवीन पासवर्ड भरा.
पुढील स्टेपमध्ये , 2 प्रोफाइल प्रश्न निवडा आणि त्यांची उत्तरे द्या आणि त्यांना भविष्यातील रेफरेंससाठी सेव्ह करा.
रजिस्ट्रेशननंतर, निवृत्तीवेतनाच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक मेल पाठविला जाईल. आपले खाते सक्रिय करण्यासाठी एक लिंक असेल. एकदा खाते सक्रिय झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारक रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्डसह वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. लॉगिनच्या 3 अयशस्वी प्रयत्नांनंतर पेन्शनधारकांना हे देखील लक्षात ठेवावे लागेल की खाते स्वयंचलितपणे लॉक होईल.
पेंशनधारक अशाप्रकारे तक्रार करू शकतात
कोणताही पेन्शनधारक एसबीआयच्या सेवांबाबत समाधानी नसेल तर ते एसबीआयकडे खालील माध्यमांद्वारे तक्रार करू शकतात-
आपण “UNHAPPY” असे टाइप करून 8008202020 वर एसएमएस करू शकता.
24×7 SBI कस्टमर केयर टोल फ्री नंबर 18004253800/1800112211/1800110009 या 08026599990 वर कॉल करू शकता.
बँकेच्या www.sbi.co.in या वेबसाइट वर जाऊन किंवा [email protected] / [email protected] वर ईमेल पाठवून.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.