हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देताना विविध बँकिंग सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या अनेक शुल्कांपैकी एका शुल्क काढून टाकले आहे. एसबीआय ने मोबाईल फंड ट्रान्सफर करण्यावर द्यावा लागणारा एसएमएस चार्ज काढून टाकला आहे. SBI ने याबाबत माहिती देताना सांगितले की, आता युझर्सना USSD सर्व्हिस वापरून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे ट्रान्सझॅक्शन करता येतील.”
एसबीआय ने ट्विट करत सांगितले की, “मोबाईल फंड ट्रान्सफरवरील SMS चार्ज आता माफ झाले ! आता ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे ट्रान्सझॅक्शन करू शकतील.” बँकेने पुढे म्हटले की,” ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे पाठवणे, रिक्वेस्ट मनी, अकाउंट बॅलन्स,मिनी स्टेटमेंट आणि UPI पिन बदलणे यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.”
कोणाला फायदा होईल ???
फीचर फोन असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. हे लक्षात घ्या कि, USSD किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा सहसा टॉक टाइम बॅलन्स किंवा खात्याची माहिती तपासण्यासाठी वापरला जातो. तसेच मोबाईल बँकिंग व्यवहारातही याचा वापर केला जातो. ही सर्व्हिस फीचर फोनवर काम करते. त्यामुळे फीचर फोन असलेल्या ग्राहकांना याचा फायदा होईल. देशातील 1 अब्जाहून जास्त मोबाईल फोन युझर्सपैकी 65% पेक्षा जास्त अजूनही फीचर फोनचे ग्राहक आहेत.
घरबसल्या अशा प्रकारे उघडा खाते
ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयकडून घरबसल्या खाते उघडण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना डिजिटल बचत खाते उघडण्याची परवानगी देते, ज्यामध्ये ग्राहकांना जवळच्या स्थानिक बँकेला भेट देण्याची गरज नाही. आता कोणत्याही कागदपत्राशिवाय ते सहजपणे आपले बँक खाते उघडू शकतात. SBI कडून YONO App द्वारे ही सुविधा ग्राहकांना दिली गेली आहे.
अलीकडेच SBI कडून आपल्या बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये 70 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, या वाढीसह सुधारित दर आता 13.45% आहे. 15 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर या बेंचमार्कशी जोडलेली बँकांची कर्जे महागली आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/
हे पण वाचा :
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या
Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा
UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी