‘या’ कंपनीबरोबर SBI ची हातमिळवणी, डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल स्वत:चं घर

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ‘महिंद्रा लाइफ स्पेस डेव्हलपर्स इस्टेट’ या कंपनीने जिचे ‘रिअल इस्टेट’ आणि ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट’ फर्म असणाऱ्या कंपनीने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सोबत हातमिळवणी केली आहे. याचा फायदा कर्मचारी आणि ग्राहकांना होऊ शकतो. यामुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने गृहकर्ज उपलब्ध होऊ शकते. कंपनीने आज यावर स्वाक्षरीही केली आहे. दोन्ही कंपन्यांनी देशभरातील ग्राहकांना विशेष सवलत देण्यासाठी हा करार केला आहे. या करारानुसार को प्रमोशनल अॅक्टिविटी आणि ओउटरीच इनिशिएटिव्ह यांचा समावेश आहे.

https://t.co/Dz5hH4ytI3?amp=1

या कराराविषयी महिंद्रा लाइफस्पेससचे सिईओ अरविंद सुब्रमण्यम यांनी माहिती दिली. कंपनीने स्टेट बँके सोबत करार केला असून यातून महिंद्राची स्वस्त घरे दोन्ही कंपन्यांचे ग्राहक व कर्मचारी यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे अरविंद सुब्रमण्यम म्हणाले. ‘भारतीय स्टेट बँकेने आधीच बंगळुरू, पुणे, चेन्नई आणि नागपूरमध्ये महिंद्रा लाइफस्पेसस या प्रोजेक्टला परवानगी दिली आहे. अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर श्रीकांत यांनी दिली आहे. या करारानंतर अनुमोदित होम बायर्स प्रयोजनासाठी ‘टीआयआर’ आणि ‘व्हॅल्युएशनवर’ होणाऱ्या खर्चात बचत करता येऊ शकते.

https://t.co/tKl0hHg2n0?amp=1

1994 साली महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर या कंपनीची स्थापना झाली. सध्या या कंपनीचा 19.4 बिलियन अमेरिकन डॉलरचा व्यवसाय असून भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये या कंपनीकडून निवासी योजनांच्या सुविधा दिल्या जातात.

https://t.co/LPjqevnEBS?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here