हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित पर्यायामध्ये सरकारी योजनांचा देखील समावेश होतो. आज आपण Post Office च्या एका अशा स्कीमबाबत चर्चा करणार आहोत ज्यामध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर दुप्पट पैसे मिळतील.
Post Office च्या या योजनेचे नाव किसान विकास पत्र (KVP) आहे. या योजनेत 1,000 रुपयांद्वारे गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची देखील मर्यादा नाही. या योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 124 महिने (10 वर्षे 4 महिने) आहे. 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेचा लॉक-इन कालावधी 2.5 वर्षांचा आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय
जर आपण दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरेल. या योजनेमध्ये व्याजदर हे तिमाही आधारावर निश्चित केले जातात. सध्या या योजनेमध्ये सरकारकडून 6.9 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच रेपो दरात सध्या झालेली वाढ पाहता आता त्याच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. Post Office
ही योजना कशी खरेदी करावी ???
Post Office व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून देखील ही योजना खरेदी करता येईल. यामधील गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते, त्यामुळे पैसे मॅच्युरिटीवर दुप्पट होतात. जर यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर 124 महिन्यांनंतर ही रक्कम दुप्पट होऊन 10 लाख रुपये होईल.
जॉईंट अकाऊंटची सुविधा देखील उपलब्ध
यामध्ये जॉईंट अकाऊंटची सुविधा देखील मिळते. जरी हे खाते प्रौढांसाठी सुरू केले गेले असले तरी अल्पवयीन (10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल) देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र हे खाते प्रौढ व्यक्तीनानेच सांभाळावे लागेल. त्याच बरोबर ट्रस्ट देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/saving-schemes/kisan-vikas-patra/
हे पण वाचा :
HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ
‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!