वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट; मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत. मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले.

काय आहे प्रकरण
मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक करून 3 मॉडेल्सची सूटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एकूण 3 जणांची सुटका केली आहे. यापैकी दोन मॉडेल्स असून त्यांचे वय 22 वर्षे आणि 25 वर्षे असे आहे तर तिसरी महिला हि ही मॉडेल नसून तिचे वय 35 वर्षे आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे तसेच ब्युटीशियन आहे. पोलिसांना या सेक्स रॅकेटची टीप मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. यानंतर पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर या ठिकाणी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

You might also like