शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने जिंकली आहेत.

शाहरुख आणि गौरी यांच्या उदारतेबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी बीएमसीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “शाहरुख खान आणि गौरी खान यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी अत्यावश्यक वस्तू,असलेल्या आपल्या या चार मजली खासगी कार्यालयाची जागा वापरण्यास दिली.याठिकाणी आम्ही लहान मुले,स्त्रिया आणि ज्येष्ठांसाठी क्वारंटाइन सेंटर उभे करू जेणेकरून आम्हांला क्वारंटाइन कॅपॅसिटी वाढवता येईल. त्यांची ही मदत आम्हाला अगदी योग्य वेळी मिळाली आहे. “

याआधीही कोविड -१९ बरोबर लढण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी शाहरुखने आर्थिक अनुदान दिले आहे.शाहरुख आयपीएलमध्ये आपली फ्रेंचायझी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) च्या माध्यमातून पीएम-केयर्स फंडामध्ये योगदान दिले आहे. याशिवाय रेड चिलीज एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मितीच्या बॅनरद्वारे त्याने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीलाही मदत केली आहे.

या अभिनेत्याने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आणि कामगारांसाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) देण्याचे वचन देखील दिले आहे.शाह फाउंडेशनच्या सहकार्याने मुंबईतील ५५०० पेक्षा जास्त कुटुंबांना किमान एका महिन्यासाठी दररोजच्या जीवनातील आवश्यक खाद्यपदार्थ दिले जातील.मीर फाउंडेशन वंचित आणि दैनंदिन वेतन मजुरांना अन्न पुरवण्यासाठी रोटी फाऊंडेशनबरोबर काम करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

 

Leave a Comment