सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे.
प्रत्येक निवडणुकीत पलूस तालुक्याने महत्त्वाची भूमिका निभावूनही आमदारकी पासून वंचित रहावे लागले. सातत्याने कडेगाव तालुक्यालाच आमदार पदाची संधी मिळाली. वंचित आघाडीतून कृष्णाकाठचा राजकीय वनवास संपवण्यासाठी लाड हे पलूस-कडेगावमधून विधानसभेची निवडणूक लढण्याचे संकेत आहेत. क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड यांनी शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या चळवळीतील पक्षाबरोबर काम केले आहे. हाच वारसा अरुणअण्णा लाड व शरद लाड हे जपत आहेत.
वंचित बहुजन आघाडी व त्यांचा वैचारिक वारसा जवळचा आहे. पृथ्वीराज देशमुख यांच्याबरोबर त्यांची अघोषित आघाडी असली तरी भाजपची विचारधारा ही लाड कुटुंबियांच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे वंचित आघाडीच्या पर्यायावर गंभीरपणे विचार सुरु असल्याचे वृत्त आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – https://bit.ly/2WAGC24
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !
भाजप प्रवेशा बाबत विश्वजीत कदमांनी दिली हि प्रतिक्रिया
मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री
धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून