हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांकडून मात्र, विरोध करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. वाईन विक्रीला विरोध करणे हा काही चिंतेचा विषय नाही. विरोधानंतर निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी आज ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. यावेळी त्यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकऱ्याच्या हितासाठी घेण्यात आलेला आहे. मात्र, त्याला सध्या काही जणांकडून विरोध केला जात आहे. आता वाईन विक्रीच्या विरोधानंतर निर्णय बदलल्यास याबाबत वाईट वाटण्याचे कारण नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात राज्य सरकारने शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी या घेतलेल्या निर्णयाला मात्र, भाजपकडून विरोध केला जात आहे. यावरून सध्या महाविकास आघाडी सरकार मधील नेते तसेच भाजप नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे.