हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असे चित्र असून या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून 2024 मध्ये आपणच येणार असे सांगितले जात आहे. या यादरम्यान आज पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचीही आज मोठे विधान केले आहे. “घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही,” असे पवार यांनी म्हंटले.
आज महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्याशी आमदारांनी अनेक मुढायांवर चर्चा केली. यावेळी चर्चेदरम्यान पवार यांनी आमदारांना तुम्ही कशाला घाबरत आहात. घाबरायचं काही कारण नाही, मी आहे ना. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असे म्हंटले.
महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आगामी २०२४ च्या निवडणुकीवरून भाकीत केले जात आहे. या दरम्यान आज नागपूर येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज लवकरच महाराष्ट्रात भगवा फडकवू असे म्हंटले तर देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी महाराष्ट्रात निवडणूक घेतल्या तरी भाजपच नंबर वनचा पक्ष असेल, असे म्हंटले आहे.