“केंद्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे ईडीकडून कारवाई”; शरद पवारांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज सकाळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांच्यावरील कारवाईच्या या संपूर्ण प्रकरणी कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. कोणतेतरी प्रकरण काढून मलिकांना अडकवले जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, जे लोक केंद्राच्या विरोधात भूमिका स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रसा देण्याचा प्रयत्न आहे,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती होती. आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही. साधा कार्यकर्ता असला, की दाऊदचे नाव घ्यायचे आणि अडकवायचे, असले प्रकार सुरु असल्याचे पवार यांनी म्हंटले.

मलिकांच्या आरोपानंतर पवार यांनी स्वतःवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, त्या काळात माझ्यावरही असाच आरोप झाला होता. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. याला आता 25 एक वर्ष झाली. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणे, त्रास देणे, जे लोक केंद्राच्या विरोधात भूमिका स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना  त्रास देण्याचा प्रयत्न आहे,’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी

Leave a Comment