सावळ्या तरुणींना सिनेमात न घेण्याच्या बोलण्यावर भडकले शेखर कपूर; म्हणाले… 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. त्या ऐवजी आता कंपनीने ‘ग्लो’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या क्रीमचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयावर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील यावर खुश झाली होती. आता दिगदर्शक शेखर कपूर यांनीही आनंद व्यक्त करत ट्विटरवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये आता सावळ्या मुलींना संधी देण्यासंदर्भात ते बोलले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्यांना तुम्ही तुमच्या सिनेमात सावळ्या मुलींना कुठे घेता असे प्रश्न केले आहेत. यावर त्यांनी रोखठोक उत्तर दिले आहे.

‘फेअर अँड लव्हली आता ग्लो अँड लव्हली म्हणून ओळखली जाणार तर? हिंदुस्थान लिव्हर कित्येक वर्षांपासून तुम्ही सावळ्या त्वचेबद्दल असभ्य टिप्पण्या देऊन आमच्या देशाच्या तरूण मुलीची स्वत:ची किंमत नष्ट करून नफा कमावत आहात. आता एखाद्या सावळ्या मुलीला तुमच्या पाकिटावर घेऊन तुमचा हेतू सिद्ध करा.’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी तुम्ही तुमच्या सिनेमात सावळ्या मुलींना संधी कुठे देता? आणि तुम्ही सावळ्या रंगावर बोलता आहात अशा कमेंट आल्या होत्या. यावर त्यांनी अगदी रोखठोक उत्तर दिले आहे.

 

नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांनी मासूम पासून मिस्टर इंडिया पर्यंत आणि अगदी बॅन्डीड क्वीन पर्यंत अशी एखादी अभिनेत्री सांगा जी तिच्या गोऱ्या त्वचेसाठी सिनेमात घेतली असेल? असा थेट सवालच त्यांनी केला आहे. बॅन्डीड क्वीन हा सत्य कथेवर आधारित शेखर कपूर यांचा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. त्यामुळे आता त्यांनी आपल्या उत्तराने आपली बाजू रोखठोक मांडली आहेच पण लोकांचे लक्षही वेधून घेतले आहे.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.