शिर्डी: हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थिर नसून लवकरच कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु, आता राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. एका नेत्याने तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे तर दुसऱ्या नेत्याने तर शिर्डीतील अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे.
शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय चिंतन शिबीर होणार आहे. या शिबीराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेना फुटली. हा आमच्या गावचा पायगुण आहे. आता राष्ट्रवादीचं अधिवेशन झाल्यावर राष्ट्रवादी फुटेल, असा दावा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. हाच धागा पकडत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच महाराष्ट्रात सर्वात भक्कम पक्ष राष्ट्रवादी आहे. भक्कम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फुटणार नाही, असा दावादेखील जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी केला. तसेच दुसरीकडे राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती