अखेर ठरलं! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expanded) मागच्या काही महिन्यांपासून रखडला होता. मंत्रिमंडळ विस्ताराला (cabinet expanded) विलंब होत असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडं सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचेदेखील लक्ष लागून राहिले होते. या सगळ्या प्रकरणावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय सिरसाट
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expanded) लांबणीवर पडला होता. मात्र आता येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असा अंदाज असल्याचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणावरही दबाव नाही, माझ्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेदेखील संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरदेखील टीका केली.

संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान करत आहेत असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील संजय राऊत यांचा दबाव असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे आता संजय शिरसाट यांनी दिलेल्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!