हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. मात्र याप्रकरणी उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून १२ ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सुनावणी लांबल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबतो का? हे सुद्धा आता पाहावे लागणार आहे.
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ सोमवारी बसणार होते ते सोमवारी बसणार नसल्याची माहिती आहे. ते खंडपीठ आता शुक्रवारी बसणार असल्याची माहिती आहे. यामुळे याप्रकरणी निकालाला अजून वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यातच सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे. आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
… म्हणून शिंदे गटातील आमदार अपात्र होऊ शकतात; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gZKRC3fdNC@HelloMaharashtr @prithvrj
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 7, 2022
कोणकोणत्या मुद्द्यांवर कोर्टात याचिका-
शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप