व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट (cricket) खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. क्रिकेट (cricket) खेळत असताना या तरुणाच्या गुप्तांगाला बॉल लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या (cricket) मैदानामध्ये घडली आहे. विक्रम गणेश क्षीरसागर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे मैदानात क्रिकट (cricket) खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका लागला. यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यानच विक्रमचा मृत्यू झाला. तावशी येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट (cricket) स्पर्धेच्या वेळी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके ?
गावातील क्रिकेट (cricket) स्पर्धेत खेळताना विक्रम क्षीरसागर नेपातगाव या टीमकडून बॅटिंग करत होता. यावेळी समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला. या घटनेत विक्रमचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे पण वाचा :

अब राजा का बेटा राजा नही बनेगा; राज- बाळासाहेबांच्या फोटोतून मनसेला नेमकं काय म्हणायचं??

वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून 22 वर्षीय मुलाने केली सावत्र आईची हत्या

पाठीत खंजीर कुणी खुपसला हे योग्य वेळी सांगेन; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

IND vs WI 2nd ODI : टीम इंडियाने इतिहास रचला ! अजून कोणालाच जमला नाही ‘हा’ पराक्रम

….तेव्हापासून गडकरी अवस्थ; शिवसेनेने सांगितलं आतील राजकारण