शिरूर बोगस डॉक्टर-हॉस्पिटल प्रकरण! पार्टनरशिपवरून झाला होता वाद; पार्टनरनेच उघडे पाडले सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका कंपाउंडरने बोगस डॉक्टर बनून 22 बेडचे हॉस्पीटल तब्बल दोन वर्षे चालवले. अशी बातमी माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. त्याबाबत अजून माहिती घेतली असता असे समजून आले की, हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी विशेष वार्ड चालू केला होता. तरीही हा प्रकार उघडकीस आला नाही. मात्र पार्टनरशिपवरून झालेला वाद हे प्रकरण बाहेर पडण्यास कारणीभूत ठरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट डिग्री आणि नावासह हॉस्पिटल गेले दोन वर्षे चालू होते. संबंधित कंपाउंडरने एका ओळखीच्या व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली होती. काही दिवसापूर्वी या दोघांमध्ये पैशावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. व पोलिसांनी तपास केला असता संबंधित कंपाउंडरचे नाव महबूब शेख असल्याचे समोर आले.

मेहबूब शेख ने डॉक्टर महेश पाटील या बनावट नावाने डिग्री घेऊन शिरूरमध्ये मोरया हॉस्पिटल सुरू केले. मेहबूबला अटक झाली असून या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. मेहबूब मूळचा नांदेडचा असून एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून कामाला होता. त्याने बनावट हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार केला आणि एकाला सोबत घेतले. हॉस्पिटल चांगले चालत असल्याने त्यातून मिळणाऱ्या पैशांवर दोघांचा वाद झाला व हे प्रकरण पोलिसात पोहोचले. शेख यांच्याविरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group