केंद्र सरकारची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भूमिका ढोंगी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमधील बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरातून त्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्रातील भाजपच्या संवेदनशील नेत्यांनी काही भाष्य केले नाही. लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपने तांडव केले असते. कर्नाटकटी घडलेल्या घटने असंदर्भात केंद्राची भूमिका ढोंगी आणि दुटप्पीपणाची आहे, आहे शुद्ध झाले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

शिवसेना अखासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज संघर्ष याचं प्रतिनिधीत्त्व गेल्या सत्तर वर्षांपासून करत आहे. त्यांनी मराठी बांधवांसाठी आंदोलन केले आहे. समितीनेही त्यासाठी रक्त सांडले आहे, बलिदान दिले आहे. बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरात त्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी जबरदस्ती करुन अटक केली आहे.

वारणासीला जाऊन हिंदू मतदारांना भावनिक करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. शिवाजी महाराज मोगलाई विरुद्ध तळपले याची माहिती त्यांनी दिली. मात्र, कर्नाटकातील घटनेवर भाजपचे नेते तोंड उघडण्यास तयार नाहीत, हे ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.