मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण नाराजी असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे.
एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरातून प्रकाश आबिटकर, मराठवाड्यातून परभणीचे राहूल पाटील, उस्मानाबादमधील भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत, कोकणातून सहा वेळा आमदार असलेल्या गुहागरचे भास्कर जाधव, विदर्भातील रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांना संधी देण्यात आलेली नाही. उघडपणे हे आमदार नाराजी व्यक्त करत नसले तरी पक्षांतर्गत मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा सूर आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिवसेनेच्या कोट्यातून अपक्षांना दिलेल्या मंत्रिपदांबाबत काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अपक्षांना संधी दिल्यामुळे मूळ शिवसैनिकांची संधी हुकल्याचं सामानातून अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षातील नाराज नेत्यांची समजूत कशी काढता हे पाहावं लागणार आहे.
हे पण वाचा –
मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात
शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?
हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार
वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले
अजित दादा म्हणजे सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री !
देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी माणूस! मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार