मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांची मेगा भरती भाजप आणि शिवसेनेने करून घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीत परंपरेने लढवत असलेल्या जागांवर आता टाच आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेना भाजपच्या जागा वाटपात २० ते २५ जागांची अदला बदली होण्याची शक्यता आहे.
युतीचे जागा वाटप ; बार्शीची जागा भाजपला सुटणार ; आमदार दिलीप सोपलांच्या अडचणी वाढल्या
वडाळा मतदारसंघात २०१४ साली भाजपच्या उमेदवाराला अवघ्या ७०० मतांनी धूळ चारत काँग्रेसचे उमेदवार आमदार कालिदास कोळंबकर विजयी झाले. हा मतदारसंघ युतीत शिवसेना लढवत होती. मात्र आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजप प्रवेश केल्याने शिवसेनेला तो मतदारसंघ भाजपसाठी सोडावा लागणार आहे. तर तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपला पाय पसरण्यासाठी तगड्या नेत्याची आवश्यकता होती. ती राणाजगजितसिंह पाटील यांच्या रूपाने पूर्ण झाली. राणाजगजितसिंह पाटील २०१४ साली निवडून आलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात परंपरेने शिवसेना लढत आहे. मात्र राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये आल्याने ती जागा देखील भाजपला सोडावी लागणार आहे.
प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस : खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ युतीत भाजप लढवत आहे. मात्र अब्दुल सत्तार शिवसेनेत आल्याने त्यांना तिथून उमेदवारी देण्यासाठी भाजपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा लागणार आहे. तसेच विद्या ठाकूर यांचा गोरेगाव, वैभव पिचड यांचा अकोले, संदीप नाईक यांचा ऐरोली, राणाजगजितसिंह पाटील यांचा उस्मानाबाद हे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता आहे.