हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे अपरिहार्य असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, महाराष्ट्राचा कोरोना चाचण्याच जास्त होत असल्यामुळे रुग्णही जास्त सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतूक केलंच पाहिजे.असेही राऊत यांनी म्हंटल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group