मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
भाजप म्हणते आमचाच मुख्यमंत्री होणार शिवसेना म्हणते आहे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. मात्र जनतेच्या मनात तुम्हीही मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की , मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही. विनाकारण मला यामध्ये ओढू नये.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले हा सल्ला त्यांचा मनापासून होता. कि यामागे त्यांचे राजकारण आहे. हे येत्या काही काळात बघायला मिळणार आहे. त्याच प्रमाणे सध्या येत असलेल्या बातम्यांवरून तर शिवसेना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा मुद्दा बासनात गुंडाळण्याची शक्यता आहे.