मुख्यमंत्र्यांना ‘मिंधे’ म्हणत सामनातून हल्लाबोल; सत्तारांवरही घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंधे असा उल्लेख करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली. जगात हे काही घडत ते मिंधे – फडणवीस सरकार मुळेच घडत … भारतने मेलबर्न येथे पाकिस्तानचा पराभव केला तो मिंधे – फडणवीस सरकार मुळेच केला असा खोचक टोला सामनातून लगावण्यात आला.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम भुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिथे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूच्या ‘बंटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने आमच्यावर दीडशे वर्षे राज्य करून आम्हाला गुलाम करून ठेवले, त्या ब्रिटनवर आता एका भारतीय वंशाच्या तरुण पंतप्रधानांचे राज्य आले.

ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे -फडणवीस यांच्या सरकारमुळे, सुनक यांनाच पतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिथे लिहिलेले पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप आले. हे टपाल लडनला पोहोचवून ऋषी सुनक याची विटनच्या पतप्रधानपदी नियुक्ती केली गेली. आपण ब्रिटनच्या मतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या यांची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल, सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय? याचा खुलासा झालेला नाही. शिवाय जे खासदार सुनक यांना पाठिंबा देणार नाहीत त्यांना येथील ‘ईडी’ने ‘टाइट’ केले काय? ते मिथे महाशयच सांगू शकतील, पण सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच असा खोचक टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

यावेळी सामनातून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला आहे. तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे’, अशा शब्दांत ठकरे गटाने सत्तारांवर टीका केली आहे.