हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे”, अशा शब्दांत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
शिवसेनेने ममताच्या पवारांच्या भेटीवरून आज सामनातून आपले पसंखद मत मांडले आहे. त्यामधून ममतांवर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व कुणी करावे यावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेनेने आपले मत मांडले हाये. काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असं ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर यांनी केले आहे.
प्रशांत किशोर यांच्या विधानाचाही खरपूस समाचार शिवसेनेने घेतला आहार. त्यांना उत्तर देताना म्हंटले आहे की, प्रशांत किशोर यांनी लक्षात घ्यावे कि दैवी अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाचा ते येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा,” असे शिवसेनेने म्हंटले आहे.