SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. एसबीआयने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यापूर्वीच ते देश सोडून पळून गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

एसबीआयच्या तक्रारीवरून या लोकांविरोधात गुन्हा दाखल
पश्चिम आशियाई देश आणि युरोपियन देशांना बासमती तांदूळ निर्यात करणार्‍या कंपनीविरूद्ध तसेच त्याचे संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार आणि संगीता यांच्याविरोधात सीबीआयने नुकतीच एसबीआयच्या तक्रारीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी एसबीआयची १७३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप एसबीआयने केला आहे.

कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये हि बँक पण आहे सामील
एसबीआयने तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीकडे करनाल जिल्ह्यात तीन राईस गिरण्या, आठ सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट आहेत. कंपनीने सौदी अरेबिया आणि दुबई येथे व्यवसायासाठी आपली कार्यालये देखील उघडली आहेत. एसबीआय व्यतिरिक्त ज्या बँकांनी या कंपनीला कर्ज दिले आहे त्यांच्यामध्ये कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांचाही समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे छापे पडले नाहीत
अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अद्याप या प्रकरणात कोणतेही छापे घालण्यात आलेले नाहीत. या प्रकरणातील आरोपींना बोलावण्याची प्रक्रिया तपास यंत्रणा सुरू करणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी तपासात सामील झाले नाहीत तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. एसबीआयच्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी २०१६ रोजी या कंपनीचे खाते नॉन परफॉर्मिंग एसेट्स (एनपीए) झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment