औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे.
आज सकाळी 90 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हर्सूल कारागृहातिल 29 जणांचा समावेश आहे. असे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या बाबत अधिक माहितीसाठी हर्सूल कारागृहाचे पोलीस अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याची अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कारागृहातील पॉझिटिव्ह आलेले 29 रुग्ण हे कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आहेत की मग बंदिवान कैदी आहेत ? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
25 मे रोजी हर्सूल कारागृहात एकही कोरोना रुग्ण नाही. असे अधीक्षक जाधव यांनी माध्यमांना सांगितले होते. त्याच दिवशी ईद च्या निमित्ताने शेकडो बंदिवान, कैद्यांनी कारागृहात ईदची सामूहिक नमाज अदा केली होती. या दरम्यान एकाच्याही तोंडाला मास्क, रुमाल नव्हते. तर शारीरिक अंतर पाळले गेले नव्हते. त्यामुळे हर्सूल कारागृहाचा निष्काळजीपणा समोर आला होता. मात्र त्या घटनेच्या अवघ्या 10 दिवसानंतर एवढ्या मोठ्या संख्येने कारागृहात कोरोनारुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळेच कोरोनाचा संसर्ग पसरला असल्याची चर्चा सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.