हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील पनवेल येथील कोंन गावातील विलगीकरण केंद्रात धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या केंद्रात या दोघांवर उपचार सुरु होते. दोघांनाही कोरोना झाला आहे. या गावातील इंडिया बुल्स च्या रिकाम्या इमारतींमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या दोघांना या केंद्रावर आणण्यात आले होते.
प्राथमिक तपासात हे दोघे एकमेकांना ओळखत नव्हते असे समोर आले आहे. कोरोना संक्रमण असल्याकारणाने दोघांना एकाच वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले होते. सध्या या महिलेच्या आरोपांवर पोलीस तपास सुरु आहे. डॉक्टर तसेच रुग्णांची चौकशी सुरु आहे मात्र कोरोना मुळे अनेक अडचणी समोर येत आहेत.
पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार #कोरोना पेक्षा ही भयानक.याआधी ही अशा सेंटर मध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार व विनयभंगाचे गुन्हे घडलेलेतं. महत्वाचं म्हणजे
महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतात चं कसे ? सुरक्षा यंत्रणा,प्रशासन काय करत असते ? (१/२) pic.twitter.com/JLoHmDt2c2— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 17, 2020
पोलिसांनी सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी हे दोघे विलगीकरण केंद्रात आले होते आणि आता हा प्रकार समोर आला आहे. सध्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र कोरोनाबाधित असल्याने त्याला अटक केलेली नाही आहे. सध्या तपास सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.