जाह्नवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाची शूटिंग पंजाब मध्ये सुरु. शेअर केला फर्स्ट लुक!

नवी दिल्ली । 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘धडक’ (Dhadak) चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणारी अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या जोरात आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलेला ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा चित्रपट हिट ठरला. तिच्या अभिनयाचे लोकांकडून खूप कौतुकही झाले. आता अशी बातमी आली आहे की, जाह्नवीने तिच्या पुढच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जाह्नवीने आज या चित्रपटाचा पहिला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, यात ती पंजाबच्या गल्लींमध्ये सलवार सूट परिधान करताना दिसून आली आहे.

https://www.instagram.com/p/CJ5aNsCl9iL/?utm_source=ig_embed

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) ने चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर करत लिहिले कि- “जाह्नवी कपूर आनंद राय यांच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले आहे.” चित्रपटाचे पहिले शेड्यूल मार्च 2021 पासून सुरू होईल. सिद्धार्थ सेन गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. सुभाषकरन आणि आनंद एल राय हे चित्रपट सादर करणार आहेत. दिपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती कलर यलो प्रॉडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सँडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. ”

https://www.instagram.com/p/CJ5aGscMzms/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वी जाह्नवी कपूर तिचा बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनबरोबर सुट्टीसाठी गोव्यात गेली होती. जिथे हे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. अलीकडे दोघेही एकत्रितपणे मुंबईला परतले आहेत. कार्तिक जाह्नवीसोबतच्या ‘दोस्ताना’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. याशिवाय राजकुमार राव याच्यासमवेत जाह्नवी ‘रुही अफझाना’ मध्येही दिसणार आहे. तसेच जाह्नवीकडे ‘तख्त’ ची ही ऑफर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like