हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एक सनदी अधिकारी ते लोकसेवा करणारा राजकारणी असा खासदार पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. सिक्कीमचे राज्यपाल असतानाची कामगिरी असो व भारतीय प्रशासकीय सेवेतील काम असो, प्रत्येकच ठिकाणी पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज खासदार पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर एक खास पोस्ट लिहिली आहे. समजावणारी व समजून घेणाऱ्या सहजीवनाच्या जोडीदारणीस विवाहदिनाच्या शुभेच्छा..असं म्हणत खासदार पाटील यांनी पत्नी सौ. रजनीदेवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Shrinivas Patil History in Marathi
खासदर श्रीनिवास पाटील यांची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे (Shrinivas Patil History in Marathi) –
आज १३ मे. आज आम्हा उभयतांचा लग्नाचा वाढदिवस अर्थात विवाहदिन. १३ मे १९६८ साली कराड येथे सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील चिंचणेर वंदन हे मूळ गाव असलेल्या बर्गे या सैनिकी परंपरा असलेल्या कुटुंबातील लाडकी कन्या रजनीदेवी हिच्याशी आयुष्यभरासाठीच्या ऋणानुबंधाची गाठ जुळली. त्यावेळी मी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होतो. पत्नी सौ. रजनीदेवी सोबतचा आजवरचा ५४ वर्षांचा सहजीवनाचा प्रवास अतिशय आनंददायी असा आहे.
आजवरच्या जीवनप्रवासात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली, माझ्या जीवनाला स्थैर्य आणि धैर्य देणारी प्रभावी व्यक्ती म्हणजे पत्नी सौ. रजनीदेवी. कराड येथे विवाह पार पडल्यानंतर सुट्टी संपताच आठवड्याभरातच हिंगणघाट येथे जावे लागले. तेव्हापासून प्रशासकीय जीवनाच्या कार्यकाळात बदलीनिमित्ताने अनेक वेळा नवनवीन ठिकाणी जावे लागले, परंतु पत्नी रजनीदेवी हिने प्रत्येक ठिकाणची नवी संस्कृती,चालीरीती अगदी सहजपणे आत्मसात करत घराची जबाबदारी सांभाळली.
प्रशासकीय सेवेत असताना कायम वेळेच्या मर्यादा न पाळता कामात राहणे, दौऱ्यावर असणे, समाजकारण व राजकारणासाठी कायम घराबाहेर राहणे हाच दिनक्रम असतो. सौ. रजनीदेवींचे मला कायम सांगणे राहिले आहे की, ‘तुम्ही जेव्हा घरातून लोकसेवेसाठी बाहेर पडाल, त्यावेळी तुम्ही केवळ समाजाचे, जनतेचे आहात. त्यावेळी माघारी कुटुंबाची अजिबात काळजी करू नका. पण ज्यावेळी तुम्ही बाहेरून घरात याल, त्यावेळी सर्व ताण-तणाव विसरून तुम्ही केवळ कुटुंबाचे रहा’. पत्नीने समर्थपणे प्रपंचाची, मुलाबाळांची, नाती-गोती व पै-पाहुण्यांची जबाबदारी सांभाळल्यामुळे निश्चिंतपणे प्रशासकीय अधिकारी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक कर्तव्याला व लोकांना भरपूर वेळ देऊ शकलो आहे आणि आजही ते काम अविरतपणे चालू आहे. Shrinivas Patil History in Marathi
सार्वजनिक जीवनाचा डोलारा व आयुष्याचा सारीपाट पेलताना समजावणारी व समजून घेणाऱ्या पत्नी सौ. रजनीदेवी हिचा आजवरच्या सफल सहजीवनाचा वाटा अधिक आहे. सहजीवनाच्या जोडीदारणीस विवाहदिनाच्या शुभेच्छा..!
महत्वाच्या बातम्या –
राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला कोब्रा
राज्यातील ‘हे’ गाव ठरले देशातील पहिले मधाचे गाव; उद्योगमंत्री देसाईंकडून घोषणा
e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार ‘हे’ फायदे
Prepaid Plans : वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कोणता ???