हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केला मुळे इथला जनसमुदाय संतापला आहे. लोक अनेक माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या एका प्रतिक्रियेवर एका पोलिसाने त्यांना ‘जर तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा” अशा शब्दांत सुनावले आहे.
जनतेचा रोष पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत टिका केली होती. तसेच ज्या शहरात ही घटना घडली त्या मिनियापोलीस शहरात गव्हर्नरशी बोलताना त्यांनी बळाचा वापर करून हिंसाचार थांबवा असे सांगितले होते. ते म्हणाले होते, “तुम्ही आंदोलनकर्त्यांवर वर्चस्व मिळवायला हवे आणि तुम्ही तसे करत नसाल तर तुमचा वेळ तुम्ही वाया घालवत आहात. ते तुमच्यावर धावून येत असतील तर तुम्ही त्यांच्यावर वर्चस्व मिळवायला हवे.” त्यांनी यावेळी मिनियापोलीस शहरातील राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कौतुक केले होते.
ट्रम्प यांच्या या सल्ल्यावर ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवदो यांनी ट्रम्प याना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते सर्व पोलीस प्रमुखांच्या वतीने ट्रम्प यांना म्हणाले, “तुमच्याकडे बोलण्यासारखे काही नसेल तर तुम्ही तोंड बंद ठेवा. हे सर्व वर्चस्व मिळविण्यासंबंधी नाही तर लोकांचे मन जिंकण्याविषयी आहे. आम्ही जनजीवन जे पूर्व पदावर आणले आहे ते दुर्लक्षामुळे आम्ही खराब करू इच्छित नाही.” तसेच हा हॉलिवूड सिनेमा नाही तर वास्तविक जीवन असल्याचा टोलाही त्यांना मारला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.