… तर भारतात पुन्हा सुरू होईल Tiktok, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प भारतात टिकटॉक (Tiktok) खरेदी करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँक यासाठी सक्रियपणे भारतीय साथीदारांचा शोध घेत आहे. गेल्या एका महिन्यात सॉफ्टबँकने रिलायन्सच्या जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडच्या प्रमुखांशीही बोलणी केली आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स लिमिटेडमध्ये सॉफ्टबँकची भागीदारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेमुळे भारतासह अनेक देशांनी टिकटॉकवर बंदी घातली आहे. सॉफ्टबँक, बाईटडन्स, रिलायन्स आणि भारती एअरटेलने यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये टिकटॉकवर बंदी घातली
भारत-चीन सीमा वादानंतर (India-China Border Rift) भारताने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्यामुळे चिनी कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणल्यामुळे मूळ कंपनी ByteDance चे मोठे नुकसान झाले आहे. या बंदीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ByteDance कंपनीचे पुनर्गठन करण्याचा विचार करीत आहे.

कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले
विशेष म्हणजे सुरक्षेचे कारण सांगून भारताने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. भारताने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्यामुळे चीनच्या त्याच कंपनीचे 45 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही कंपनी टिक टॉक आणि हॅलोची मदर कंपनी आहे. चीनमधील सर्व अ‍ॅप्समध्ये टिकटॉक सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक सेलिब्रिटी ट्विटर युझर्सच्या फॉलोअर्सची संख्या लाखोमध्ये आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार ByteDance चे 6 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

भारतात 20 कोटींहून अधिक युझर्स आहेत
चिनी अ‍ॅप टिकटॉकचे भारतात 200 20 कोटींहून अधिक युझर्स होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिकटॉकवर बंदी घालण्याची धमकी दिली. त्यांनी बाईटडन्सला अमेरिकेत त्यांची मालमत्ता विक्री करण्याचे आदेश दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.