हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षामध्ये खदखद सुरू असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली.
नवाब मलिक म्हणाले, भाजप आता हतबल झालं आहे. दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही. आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही. विरोधी पक्षाची गँग त्यात अयशस्वी झाली आहे. आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणविसांना हटवायचंय? भाजप अंतर्गतच नव्या विरुद्ध जूने वाद निर्माण झाला होता.
नवाब मलिक पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांचे तिकीट पण आता तावडेंचं केंद्रात पुनर्वसन करण्यात आलं आहे. सध्या भाजपमध्ये खदखद सुरू आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते येतील. पक्षातून गेलेल्यांचा घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे, असं नवाब मलिक यांनी म्हंटल.