पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरु होणार आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक (Time Table) या अगोदर सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले होते.
इतर कोणतंही वेळापत्रक ग्राह्य धरू नये, बोर्डाने दिला इशारा
संकेतस्थळावर असलेली वेळापत्रकांची (Time Table) सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेआधी शाळा, महाविद्यालयात छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून (Time Table) परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावं. तसेच व्हॉटसअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ग्राह्य धरू नये असा इशारादेखील बोर्डाने दिला आहे.
हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल