आपली नोकरी सोडून सुरू करा हा व्यवसाय, दररोज कराल 4000 रुपयांपर्यंतची कमाई…कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक रस आहे. कोरोना काळाने व्यवसायाचे महत्त्व दुप्पट केले आहे. अशा परिस्थितीत आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी पहिले सर्व माहिती मिळवणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा एका खास व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती देत ​​आहोत, ज्याची सुरुवात करुन तुम्ही दररोज 4000 रुपये मिळवू शकता. म्हणजे महिन्याला लाखो रुपये. केळाचे चिप्स बनवण्याचा हा व्यवसाय आहे. केळाचे चिप्स आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच लोकं या चिप्स उपवासामध्ये देखील खातात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा केळाचे चिप्स जास्त लोकप्रिय आहेत, यामुळे या चिप्सही मोठ्या प्रमाणात विकल्याही जातात.

केळाच्या चिप्सचा मार्केट साइज़ छोटा असतो, त्यामुळे मोठ्या ब्रांडेड कंपन्या केळाचे चिप्स बनवत नाहीत आणि हेच कारण आहे की केळाचे चिप्स बनविण्याच्या व्यवसायात चांगली संधी आहे. तर आपण हा व्यवसाय कसा सुरू करू शकता ते जाणून घेउयात …

केळाचे चिप्स बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी:
केळाचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात आणि प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि इतर मसाले कच्चा माल म्हणून वापरतात. काही प्रमुख मशीनरी आणि उपकरणे खालीलप्रमाणे आहेत.

> केळी वॉशिंग टँक आणि केळी सोलण्याचे मशीन

> केळी कटिंग मशीन

> फ्राईंग मशीन

> मसाला मिक्सर

> पाउच प्रिंटिंग मशीन

> प्रयोगशाळा उपकरणे

ही मशीन्स कोठे खरेदी करायची:
केळाच्या चिप्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html वरून ही मशीन खरेदी करू शकता. हे मशीन ठेवण्यासाठी आपल्याला कमीतकमी 4000 5000 चौ. फूट चांगल्या जागेची आवश्यकता असेल. ही मशीन आपल्याला 28 हजार ते 50 हजारांपर्यंत मिळेल.

https://t.co/e437xqGsVq?amp=1

50 किलो चिप्स बनविण्यासाठीचा खर्च :
50 किलो चिप्स तयार करण्यासाठी किमान 120 किलो कच्ची केळी आवश्यक असेल. आपल्याला सुमारे 1000 रुपयांमध्ये जवळपास 120 किलो कच्ची केळी मिळेल. यासह, 12 ते 15 लीटर तेल आवश्यक असेल. 15 लिटर तेलाची किंमत 70 रुपयांनुसार 1050 रुपये असेल. चिप्स फ्राईंग मशीन 1 तासामध्ये 10 ते 11 लिटर डिझेल वापरते. 1 लिटर डिझेलची किंमत 80 रुपये आहे, 11 लिटरच्या हिशेबाने जे 900 रुपये असेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपये असेल. तर 50 किलो मीठ आणि मसाले 3200 रुपयांमध्ये तयार होईल. म्हणजे केळाच्या चिप्सच्या एका पॅकेटची किंमत पॅकिंगच्या किंमतीसह 70 रुपये असेल. जी तुम्ही ऑनलाईन किंवा किराणा दुकानात 90 किंवा 100 रूपये किलोने सहज विकू शकाल.

https://t.co/YltyZUTJVN?amp=1

1 लाख रुपयांचा नफा मिळवू शकतो
जर आपण 1 किलोपाठीमागे 10 रुपयांच्या प्रॉफिटचा विचार करत असू तर आपण सहजपणे दिवसाला 4000 रुपये कमवू शकता. म्हणजेच, जर आपली कंपनी महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर आपण एका महिन्यात 1 लाख रुपये कमवू शकता.

https://t.co/l9t3lXvVul?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment