“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजूबा…”, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या दरम्यान आज भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याचे म्हंटले आहार. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हंटले आहे की, “काही पक्षांचे विचार एक्स्पायर झाले आहेत. तरी काही प्रमाणात ते निवडून येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स एक्स्पायर झाला असेल, तर त्यांच्या आसपासचे अधिकारी कसे काम करतात हे दिसून येते. जर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स काढला जात नसेल, तर “सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे”, असे मुनगंटीवार यांनी म्हणत टीका केली आहे.

यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावरून त्यांना टोला लगावला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४मध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल”, असे म्हंटले आहे. त्यांचे उत्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विचारा. ते त्यांच्यासोबत ऊठबस करतात. ते योग्य उत्तर देऊ शकतील”, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment