सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील लकडे मळा या ठिकाणी उसाच्या शेतात वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. वासंती श्रीकांत देशींगे-लकडे असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. मृत वासंती या नेहमीप्रमाणे पहाटे मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या महिलेला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली. मात्र ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली अजून समजू शकलेले नाही. मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मृत वासंती देशींगे या गेल्या 35 वर्षांपासून त्यांचा भाऊ विनायक व सुधाकर लकडे यांच्या घरी राहात होत्या. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे सुमारे पाच साडेपाचच्या दरम्यान शेतात असलेल्या म्हसोबा मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र बराच वेळ झाला तरी त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरु केला पण त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.
यानंतर बराच काळ शोध घेतल्यानंतर घरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणाची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असता या महिलेचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा दाबून हत्या (Murder) केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
ट्रेनचे तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट कसे मिळवावे ते समजून घ्या
फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज
E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी
सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा भाजपचा कार्यक्रम; शरद पवारांचा हल्लाबोल
10वी- 12वी चा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार; बोर्डाची माहिती