सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणाबाबत दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारकडून जाब विचारला गेला आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत सर्व प्रोफाइल व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून बेकायदेशीर आणि चुकीच्या पोस्ट काढता येतील. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक प्रोफाइल तयार करून लोकांची फसवणूक केली जात आहे. अनेक सरकारी एजन्सींनी लोकांना याबद्दल सावध रहायला सांगितले आहे.

फेक प्रोफाइल बनवून फेसबुकच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये हडप केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे यूपी एसटीएफने फेसबुकवर होणाऱ्या फसवणूकीबद्दल लोकांना इशारा दिला आहे. फेसबुकवर फेक प्रोफाइल बनवून लोकांकडून पैसे काढून त्यांना मूर्ख बनवण्याचा नवीन धंदा सुरू केला आहे. अशाच एका प्रकरणात पीडित फेसबुक युझरने आपल्या टाईम लाईनमध्ये असे लिहिले होते की “माझ्या नावाने फ्रॉड आयडी बनवून लोकांना पैशासाठी विचारले जात आहे, कृपया कोणीही पैसे देऊ नका.”

सोशल मीडियावर सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, आपण आपले बचत केलेले भांडवल गमावू नये, यासाठी सेटिंग्जमध्ये जा आणि लोकेशन बंद करा अन्यथा चोरांसाठी काम आणखी सोपे होईल. सायबर एक्सपर्ट विपिन यांच्याकडे फसवणूक झालेले अनेक लोकं येतात.

या फ्रॉडपासून वाचण्याचे मार्ग ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते, फेसबुक सेटिंगमध्ये फेस रेकग्निशन टर्न ऑन करा. फेसबुक लोकेशन बंद करा. फेसबुकवर फोन बँकिंग नंबर लिहू नका. फेसबुकवर आपला ईमेल लिहू नका. सोशल मिडियावर जास्तीत जास्त माहिती द्या जी आपली गोपनीयता वाचवेल कारण आपण जितके डिजिटल प्लॅटफॉर्म वापरता तितकेच ते सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने देखील असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.