‘मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार पण एक अट आहे…. नेमक्या काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

sushma andhare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी (sushma andhare) किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी मनसेने आज केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे (sushma andhare) या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या टार्गेटवर होते. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे.

मनसेवर साधला निशाणा
यादरम्यान सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी मनसेवर देखील जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून आज ह्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मनसे नेहमी ड्रामा करते. त्याचं नेहमीचंच आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी हेच केलं. ते ठरवून आंदोलन करतात अशी टीका अंधारे यांनी यावेळी मनसेवर केली.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती