कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहराच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरूध्द गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन रतन झेंडे (वय- 39, रा. शनिवार पेठ, कराड), यांच्यासह टोळीतील प्रतिक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (वय- 25, रा. रैनाक गल्ली, शनिवार पेठ कराड), परशुराम रमेश करवले (वय-20, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ कराड) ,अविनाश प्रताप काटे (वय- 23, रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ कराड) या टोळीतील चौघांनाही सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
कराडचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडून पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना वरील चौघांच्या तडीपारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी होवून 2 वर्षाकरीता चौघांना तडीपार कण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.