घोरपडीचे मटण खाणे पडले महागात; पाटण तालुक्यातील तिघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

घोरपड या प्राण्याची शिकार करून त्यांचे मटन करून खाण्यार्‍या तिघांना वनविभागाच्या अधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे घोरपडीचे मटन खाणे चांगलेच महागात पडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढरेवाडी – वजरोशी (ता. पाटण) येथील विनोद घाडगे या नामक व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेल्या मृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. यांची माहीती गोपनीय पध्दतीने मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली होती. त्यावरून पाटणचे वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल विलास काळे, ढोरोशीचे वनपाल अशोक राऊत, वनरक्षक रविंद्र कदम, वनरक्षक अरविंद जाधव व इतर दोन व्यक्ती यांनी सापळा रचून फडतरवाडी (घोट) येथून विनोद घाडगे या व्यक्तिस चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, चौकशीअंती वन्य प्राण्याची शिकार केलेल्या भाऊ गंगाराम साळुंखे, गणपत मारूती साळुंखे, सिधु गणपत साळुंखे यांना ताब्यात घेवून गणपत मारूती साळुंखे यांच्या राहत्या घरात घोरपडीचे शिजवलेले मटन ताब्यात घेतले. अल्यमिनिअमचे पातेले, कोयता व लाकडी ठोकळा इतर साहित्य जप्त केले. घटनास्थळांचा पंचनामा करून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोदविंला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे हे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment