बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी मनपाचा मालमत्तावर हातोडा

औरंगाबाद: न्यायालयाच्या आदेशानुसार बीड बायपास रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या सात मालमत्तांवर शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने हातोडा टाकला. या कारवाईस प्रारंभी विरोध झाला. मात्र नंतर सर्व मालमत्ता पाडण्यात आल्या सकाळी महानुभाव आश्रम चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात सात मालमत्तावर मनपाने बुलडोझर फिरवला. बीडबायपास रुंदीकरण करत असताना दोन वर्षांपूर्वी मनपा विरुद्ध 23 मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली … Read more

शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट थकले ; संदीपान भुमरे यांच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश

औरंगाबाद: साखर आयुक्तांनी दिलेली मुदतवाढ संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट न केल्याने शरद सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश अखेर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जप्त मालमत्तेची विक्री करून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. तर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे चेअरमन असलेल्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी … Read more

आज आणि उद्या औरंगाबाद मध्ये कडक लॉकडाऊन; काय राहणार चालू आणि बंद पहा..

औरंगाबाद दि.13 (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबादेत वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे.शिवाय शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.आज आणि उद्या जिल्ह्यात कडक स्वरूपाचा लॉकडाऊन राहणार असून यामध्ये कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार आहे कोणकोणत्या सुविधा बंद राहणार आहे ते पहा. ————————— चालू राहणाऱ्या सुविधा वैधकीय सेवा,वृत्तपत्र मीडिया … Read more

पर्यटन आधारित व्यवसायावर संकट; पुन्हा आली उपासमारीची वेळ

औरंगाबाद: कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने हळूहळू बरेच क्षेत्र सुरू करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर हॉटेल्स, मॉल उघडले परंतु तरीही पर्यटन स्थळे खुली करण्यात आली नव्हती. ती सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली होती. त्याची दखल घेत पर्यटन स्थळे खुली करण्यात आली होती. त्यामुळे हळूहळू पर्यटक देखील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे पर्यटन … Read more

आर.टी. ई. प्रवेशाला उस्फुर्त प्रतिसाद; अवघ्या सात दिवसात साडेपाच हजार अर्ज

औरंगाबाद : आर.टी.ई प्रवेश 2021-22 या वर्षासाठी तीन मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अवघ्या सात दिवसात जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत . त्यामुळे यावर्षी आरटीई प्रवेशाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय. यावर्षी मराठी प्रवेश प्रक्रियेत 603 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली आहे. त्यासाठी … Read more

चिकलठाणा विमानतळावर फेऱ्या नियमित सुरू करा; खा.डॉ.कराड यांची एअर इंडिया कडे मागणी

aurangabad Airport

औरंगाबाद :औरंगाबाद विमानतळावर औरंगाबाद ते दिल्ली, मुंबई यासह पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गोवा जयपूर जोधपूरला थेट विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी खा.डॉ.भागवत कराड यांनी एअर इंडियाचे सी. एम. डी. राजीव बन्सल यांच्याकडे केली. सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाची विमाने येतात तर इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली, औरंगाबाद ते मुंबई साठी फुल … Read more

औरंगाबादकरांचा लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी प्रतिसाद; 9 वाजताच झाले शहर बंद

औरंगाबाद : गुरुवार पासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी अंशतः लॉकडाऊनला प्रतिसाद देत रात्री 9 च्या आत घरात राहणे पसंत केले. बाजारपेठेत 9 नंतर शुकशुकाट झाला होता. 11 … Read more

बँक उध्वस्त होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न – आ.हरिभाऊ बागडे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बँक आणि लातूर येथील बँक नफ्यात आहेत. पारदर्शक पद्धतीने कारभार केल्यामुळे बँक चांगल्या स्थितीत आहेत. सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवत आम्ही काम करत आहोत. सहकारक्षेत्र उध्वस्त होऊ नये बँक वाचवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय संचालक कार्यरत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, … Read more

गुन्हे दाखल करण्यासाठी जयंत पाटील पोलिसांवर दबाव टाकत आहेत – आमदार प्रशांत बंब

jayant patil Prakash bamb

औरंगाबाद: कृष्णा पाटील डोंणगावकर यांनी साखर कारखान्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला असून यामध्ये साखर निर्यात घोटाळा, डॅमेज शुगर, सभासदांचा विश्वासघात करून 5 कोटी 41 लाख 622 रुपयांचा अपहार,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नोकरी घोटाळा केला असून कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल असून आपलेच लोक आपल्या मराठवाड्याचा साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील … Read more

700 किलोमीटरच्या जलवाहिनीचे सर्वेक्षण पूर्ण

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. पाण्याच्या टाक्या बांधण्यासह कंत्राटदार कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी या 40 किलोमीटर मुख्य पाईपलाईनसह शहरात 1900 पैकी 700 किलोमीटरच्या अंतर्गत पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. राज्य शासनाने ऑक्टोबर 2019 मध्ये शहरातील 1680 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर केली. 12 … Read more