अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार ; राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रावर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अन्नदाता अधिकार मागत असताना सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल. राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण … Read more

सरकारला तर लाज वाटायला पाहिजे; गॅस दरवाढीवरून प्रकाश राज केंद्र सरकारवर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई झपाट्याने वाढत असून महागाई वर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरत आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून आता अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. “गेल्या तीन महिन्यांत गॅस … Read more

स्टेडियमला मोदींचं नाव, म्हणजे भारत आता एकही सामना हरणार नाही – उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमच नामांतरण नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर देशातील भाजप विरोधकांनी मोदींना लक्ष्य केले आहे. दरम्यान यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला आहे. स्टेडियमला मोदींच नाव दिल आहे म्हणजे आता भारत एकही सामना हरणार नाही असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला. गुजरातमध्ये सरदार पटेलांचे … Read more

मोदींचा हिंदू परीचारीकांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचली – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे … Read more

मोदींच्या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’ ?? ; आसामी गमछा आणि केरळ-पुद्दुचेरीच्या नर्स ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवूया अस आवाहन यावेळी मोदींनी केलं. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि काही ‘योगायोगांमुळे’ त्यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदींच्या या लसीकरणादरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये येऊ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे आवाहन नरेंद्र मोदी … Read more

कार्यालयीन वेळेमध्ये होऊ शकतो बदल! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

मुंबई | दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार करण्यात आली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळेच्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे समजते. कोविड-19 चा लढा अजून संपला नाही. आपण सर्व त्यासोबत लढत आहोत. आपण … Read more

धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्यांचं राज्य देशाला हानिकारक – रवीश कुमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने व्याख्यानाचं आयायोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला NDTV चे संपादक रवीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ दाभोलकरांच्या खुनानंतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं, यंदा मात्र ऑनलाईन का होईना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसती तर मनात … Read more

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर … Read more

चंद्रकांत पाटील काहीही बरळतात मला त्यांची कीव करावीशी वाटते : विकास लवांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच पुण्यात “युवा वरियर्स” या कार्यक्रमांत बोलतांना ” ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती केले असल्याची दर्पोक्ती केली. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य सध्या समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल होतं आहे. यावर अनेक उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more