चिंताजनक!! औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढला ; बरे होण्याचे प्रमाण घटले

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अलीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. जानेवारी दरम्यान शहरात कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 ते 96 टक्के होता. मात्र मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मृत्यू दरही वाढला आहे. त्यामुळे तब्बल सात टक्‍क्‍यांनी घटून 88.431 टक्क्यावर आला आहे. … Read more

आता होम आयसोलेशनला परवानगी, पण काही अटींवर- अस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने महानगरपालिकेने आता होम आयसुलेशन चा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षाखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे होम आयसोलेशन घरातच विलगीकरण करण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे. … Read more

आज आणि उद्या औरंगाबाद मध्ये कडक लॉकडाऊन; काय राहणार चालू आणि बंद पहा..

औरंगाबाद दि.13 (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबादेत वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे.शिवाय शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.आज आणि उद्या जिल्ह्यात कडक स्वरूपाचा लॉकडाऊन राहणार असून यामध्ये कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार आहे कोणकोणत्या सुविधा बंद राहणार आहे ते पहा. ————————— चालू राहणाऱ्या सुविधा वैधकीय सेवा,वृत्तपत्र मीडिया … Read more

दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार करणार ; केंद्रीय समितीच्या सूचनेनंतर मनपाचा निर्णय

auranagabad

औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती शहरात आली आहे या समितीच्या सूचना प्रमाणे येत्या दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार केले जाणार असून त्यांना शीलहि केले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा संचालक तथा केंद्रीय प्रथम प्रमुख डॉ.रवींद्रन यांच्या पथकाने शहर आणि जिल्ह्यातील करुणा आजाराचा आढावा घेतला.याच शहरात गेल्या वर्षी रुग्ण वाढत असताना … Read more

औरंगाबादेत कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती; केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या महानगरपालिकेला सूचना

औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये हजारो लोक मास्कविना फिरत आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक जण ताप आल्याने दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाची मोठी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी दिला. ही लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तपासणी वाढवा अशी सूचनाही पथकाने केली आहे. केंद्रीय अत्यावश्यक आरोग्य सेवा संचालक डॉ.रवींद्रन यांच्या नेतृत्वात पथकाने घाटीत आढावा घेतला. एन-२, एन-४ … Read more

कोरोना निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई ; जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,मनपा आयुक्तांनी रस्त्यावर उतरून केली कारवाई

औरंगाबाद: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी अंशतः लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी स्वतः शहरांमध्ये फिरून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिक,दुकांदारावर कारवाई केली. जिल्हाधिकारिसह दोन्ही आयुक्त रस्त्यावर उतरल्याने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले. राज्या पाठोपाठ शहरांमध्ये देखील कोरोना डोकंवर काढतोय, कोरोनाच संकट हे दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच ॲक्शन मोडमध्ये … Read more