जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित

औरंगाबाद | यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. ५८ हजार ४०२ असे एकूण विद्यार्थी संख्या असून या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळांना १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला असला तरीही हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग थोडासा … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

शहरवासीयं व्हायरल आजाराने त्रासले; सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांचे प्रमाण जास्त

औरंगाबाद | शहरात गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याने खासगी डॉक्टरांकडे रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजाराचे औषधोपचार सुरू केले आहेत. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता पालिकेच्या … Read more

वाळूज महानगरीत दीड महिन्यात ४२५ कोरोनाबाधित, २ कोवीड सेंटरमध्ये १९१ रूग्णांवर उपचार

औरंगाबाद |  वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी … Read more

१ लाख २७ हजार विद्यार्थी देताहेत पदवी परीक्षा, ऑफलाईन परीक्षेसाठी २१२ केंद्रे

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा मंगळपासून सुरू झाल्या. २१२ परीक्षा केंद्रांवर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदवी अभ्यासक्र माच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांना मंगळवार, १६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, धर्मगुरु, पुजारी, महंतांना सहकार्य करण्याचे आवाहन

औरंगाबाद | विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला … Read more

प्रशासनाचा आगळा वेगळा निर्णय; खाजगी दवाखाण्यासमोर शासन लावणार पाटी

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अजूनही पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता प्रशासन ज्या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यांच्या रुग्णालय दवाखान्या पुढे या डॉक्टरांनी लस घेतलेली नाही, त्यामुळे येथे उपचार घेऊ नका अशा स्वरूपाच्या पाट्या लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लस … Read more

चिंताजनक!! औरंगाबादेत कोरोनाचा डबलिंग रेट दहा दिवसांवर

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसावर आला आहे या आधी हा कालावधी 12 दिवस इतका होता मार्च महिन्यात आत्तापर्यंत चार हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात होती एक फेब्रुवारीला फक्त 18 रुग्ण होते तर ग्रामीण भागात आठ रुग्ण होते त्यामुळे … Read more

कोरोनाचा कहर सुरूच; औरंगाबादेत आढळले 720 रुग्ण

औरंगाबाद :जिल्ह्यात आज 849  जणांना (मनपा 802, ग्रामीण47) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 51017 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 720 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56678 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1334 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील … Read more